
‘डायल ११२’ चा अलार्म वाजला अन् खाकी वादळासारखी धावली! तलवारी उपसणाऱ्या ११ दरोडेखोरांना मध्यरात्रीच्या थरारात त्र्यंबकेश्वर पोलिसांनी लोळवले!
शस्त्रांचा धाक दाखवून ११ लाखांचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून ‘गेम ओव्हर’; थरारक पाठलागानंतर शस्त्रास्त्रांसह ६.८० लाखांचा मुद्देमाल जप्त ! लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२७:-त्र्यंबकेश्वर: तलवारी, कुऱ्हाडीचा धाक दाखवून तब्बल ११ लाखांचा दरोडा टाकून पसार होणाऱ्या ११ सराईत दरोडेखोरांना नाशिक ग्रामीणच्या त्र्यंबकेश्वर पोलिसांनी जीवाची परवा न करता थरारक पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत.























