अहिल्यानगर, पुणे, संभाजीनगर पिंजून काढणाऱ्या म्होरक्याला वणीत फिल्मी स्टाईल पाठलाग करून ठोकल्या बेड्या; पिस्तूल, मोटारसायकल जप्त; नाशिक पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाची थरारक कामगिरी!
नाशिक, दि. ०४/१०/२०२५ (विशेष प्रतिनिधी):
गुनाह की गलियों में चाहे कितना भी हो अंधेरा,
खाकी की एक दस्तक से हो जाता है सवेरा!
या ओळी सार्थ ठरवत, पंचवटीत वर्चस्वाच्या लढाईतून रक्ताचे पाट वाहू पाहणाऱ्या आणि शहरात दहशतीचे साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात गुंड विकी वाघ याच्या मुसक्या आवळण्यात नाशिक पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाला अखेर यश आले आहे. १७ सप्टेंबर रोजी रात्रीच्या अंधारात सागर जाधव याच्यावर जीवघेणा हल्ला करून फरार झालेला विकी वाघ, आपण कायद्याच्या हातापेक्षा मोठे आहोत या भ्रमात होता. मात्र, जिथे कोणी पोहोचत नाही, तिथे गुंडा विरोधी पथक पोहोचते, हे नाशिक पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
पंचवटीतील राहुलवाडी परिसरात १७ सप्टेंबरच्या रात्री विकी वाघ आणि त्याच्या १४ साथीदारांनी जुन्या वैमनस्यातून सागर जाधव याच्यावर गोळी झाडून त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेने संपूर्ण नाशिक शहर हादरले होते. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी १४ आरोपींना अटक केली होती, पण या कटाचा मुख्य सूत्रधार आणि गोळी झाडणारा विकी वाघ पोलिसांना सतत गुंगारा देत होता.
पोलिसांची कसोटी आणि ‘मिशन विकी वाघ‘
अपराधी कितना भी शातिर हो, भागता है गलियों में,
पर खाकी उसे ढूंढ ही लेती है, लाखों की टोलियों में!
पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गुंडा विरोधी पथकाला ‘मिशन विकी वाघ’ चे आदेश दिले होते. विकी वाघ हा एखाद्या भुताप्रमाणे पोलिसांना गुंगारा देत अहिल्यानगर, पुणे, संभाजीनगर अशा विविध जिल्ह्यांमध्ये फिरत होता. तो सतत आपले ठिकाण बदलत असल्याने त्याचा माग काढणे मोठे आव्हान होते.
अखेर तो क्षण आला...
*कानून के हाथ लंबे होते है, ये कहावत पुरानी है,
आज विकी वाघ को पकडकर, पुलिस ने फिर दोहराई कहानी है!
दिनांक ०३ ऑक्टोबर रोजी गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना एक गुप्त माहिती मिळाली. विकी वाघ वणी परिसरात येणार असल्याची ती खबर होती. या माहितीच्या आधारे पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण व सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाने सापळ्याची व्यूहरचना केली. वणी गाव आणि लखमापूर फाट्यावर दोन पथके काळ बनून टपून बसली होती.
थरारक पाठलाग आणि अटक
आज दुपारी लखमापूर फाट्यावरून विकी वाघ आपल्या पल्सर मोटारसायकलवरून वाऱ्याच्या वेगाने जाताना दिसला. क्षणाचाही विलंब न लावता, सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या पथकाने त्याचा फिल्मी स्टाईल पाठलाग सुरू केला. हा थरार पाहून रस्त्यावरील नागरिकही अचंबित झाले. अखेर कोशिंबे गावाजवळ पोलिसांनी शिताफीने झडप घालून विकी वाघच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले देशी बनावटीचे पिस्तूल आणि मोटारसायकल असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या धाडसी कामगिरीने नाशिक शहर पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की –
“शहर में गुंडों की अब खैर नहीं, क्योंकि यहाँ खाकी की चलती है, किसी और की नहीं!”
ही कौतुकास्पद कामगिरी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, आणि त्यांच्या गुंडा विरोधी पथकातील मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे, सुनिता कवडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.







