गृहमंत्री फडणवीसांचा ‘लॉ’, आयुक्त कर्णिकांचा ‘ऑर्डर’! ‘रूंगठा’च्या फरार बिल्डरांच्या मुसक्या आवळणारच; नाशिक पोलिसांचा ‘अॅक्शन प्लॅन’ तयार!

श्रीमंतीचा माज कायद्यापुढे चालणार नाही! गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा स्पष्ट संदेश; आयुक्त संदीप कर्णिकांच्या नेतृत्वाखाली फरार आरोपींचा ‘काऊंटडाऊन’ सुरू!

नाशिक: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिलेल्या ‘फ्री हँड’चा प्रत्यय नाशिककरांना आला आहे. ललित रूंघटा ग्रुपच्या साईटवर झालेल्या मजुराच्या मृत्यूप्रकरणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अत्यंत संवेदनशील आणि कणखर भूमिका घेतली आहे. या प्रकरणात केवळ अपघाताची नोंद न करता थेट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आपली निष्पक्षता सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल होताच बिल्डर लॉबीचे धाबे दणाणले असून मुख्य आरोपी फरार झाले आहेत. मात्र, “गुन्हेगार कितीही मोठा असो, त्याला कायद्यासमोर झुकावेच लागेल,” हा आयुक्त कर्णिक यांचा बाणा पाहता, फरार आरोपींच्या मुसक्या लवकरच आवळल्या जातील आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळेल, असा विश्वास नाशिककरांना वाटू लागला आहे. पोलीस पथके आरोपींच्या मागावर असून लवकरच त्यांना गजाआड केले जाईल, अशी चिन्हे आहेत.

नाशिक क्राईम विशेष | मुंबई नाका

खाकीचा ‘सिंघम’ अवतार! रूंघटा ग्रुपच्या ‘त्या’ दुर्घटनेप्रकरणी थेट मनुष्यवधाचा गुन्हा; आयुक्त संदीप कर्णिक यांनी सिद्ध केले, ‘नाशिक हा कायद्याचा बालेकिल्ला’!

■ “कायदा सर्वांसाठी समान,” गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास पोलीस आयुक्तांनी ठरवला सार्थ

■ पैशाच्या जोरावर प्रकरण दाबण्याचे मनसुबे उधळले; मुंबई नाका पोलिसांचा बिल्डर लॉबीला जबर दणका

■ लहान मासे गळाला, आता ‘मोठ्या मगरीं’ना बेड्या कधी? मुख्य सूत्रधार फरार, नाशिककरांच्या नजरा अटकेकडे!

नाशिक: श्रीमंतीचा माज आणि सत्तेचा रुबाब दाखवून कायद्याला वाकवण्याचे दिवस आता संपले आहेत, हे नाशिक शहर पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. गोविंदनगर येथील आरडी सर्कल (टेक वन) येथे ललित रूंगठा ग्रुपच्या साईटवर निष्काळजीपणामुळे एका २२ वर्षीय मजुराचा बळी गेला होता. या प्रकरणात सुरुवातीला केवळ अकस्मात मृत्यूची नोंद करून प्रकरण दडपले जाईल, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई नाका पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत थेट मनुष्यवधाचा (Culpable Homicide) गुन्हा दाखल करून, नाशिक हा खऱ्या अर्थाने ‘कायद्याचा बालेकिल्ला’ असल्याचे अधोरेखित केले आहे.

दि. १७/०२/२०२६ रोजी सायंकाळी ललित रूंगठा ग्रुपच्या टेक वन सर्कल साईटवर सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून काम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळला. यात नागेंद्र सत्यनारायण यादव (२४) या निष्पाप मजुराचा श्वास गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर दोन मजुर गंभीर जखमी झाले (सध्या सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल). ‘सेफ्टी पर्पल’ मानकांचे उल्लंघन आणि मजुरांच्या जीवाची पर्वा न केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत होते.

पोलिसांनी उधळला ‘सेटलमेंट’चा डाव

अशा घटनांमध्ये सहसा बिल्डर लॉबी पोलिसांवर दबाव आणून किंवा ‘अर्थपूर्ण’ तडजोड करून प्रकरण मयत मजुराच्या माथी मारून मोकळे होतात. मात्र, तपास अधिकारी हवालदार के.एन. गायकवाड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कायद्याचा बडगा उगारला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत बिल्डर आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळेच हा बळी गेल्याचे रेकॉर्डवर आणले आणि मजुराच्या रक्ताची किंमत पैशाने मोजणाऱ्यांना कायद्याचा हिसका दाखवला.

गृहमंत्र्यांचा विश्वास सार्थ!

 राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी संदीप कर्णिक यांची निवड करताना, शहरात कायद्याचा धाक निर्माण होईल, हा व्यक्त केलेला विश्वास आज सार्थ ठरला आहे. “गुन्हेगार कितीही मोठा असो, श्रीमंत असो किंवा राजकीय वरदहस्त असलेला असो, कायद्यापुढे कोणीही मोठा नाही,” हा संदेश या कारवाईतून संपूर्ण महाराष्ट्रात गेला आहे. पोलिसांच्या या निष्पक्ष भूमिकेमुळे नाशिककरांमध्ये आनंदाचे वातावरण असून, पोलिसांविषयीचा आदर दुप्पट झाला आहे.

नागरिकांचा सवाल: मुख्य सूत्रधार गजाआड कधी?

पोलिसांनी तातडीने हालचाली करत एफआयआर नोंदवला असला, तरी ही केवळ सुरुवात आहे. या प्रकरणातील काही ‘लहान मासे’ गळाला लागले आहेत, मात्र ज्यांच्या हव्यासापोटी हा प्रकल्प धोकादायक पद्धतीने राबवला जात होता, ते मुख्य बिल्डर आणि मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहेत. जोपर्यंत या बड्या धेंडांच्या हातात पोलीस बेड्या ठोकून त्यांची धिंड काढत नाही, तोपर्यंत मृताच्या आत्म्याला खरी शांती मिळणार नाही.

नाशिककरांची आता एकच अपेक्षा आहे—पोलिसांनी हे प्रकरण तडीस न्यावे आणि फरार मुख्य आरोपींना पाताळातूनही शोधून गजाआड करावे. कारण आता सिद्ध झालंय… नाशिकमध्ये फक्त आणि फक्त ‘कायद्याचेच’ राज्य चालणार!

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!