सुला रोडच्या ‘त्या’ एल्गारानंतर आता ‘रूंगठा’च्या बळीसाठी आमदार आक्रमक होणार का? नाशिकच्या लोकप्रतिनिधींना मजुराच्या रक्ताची शपथ!

सुला रोडच्या ‘हिट अँड रन’वर एल्गार पुकारणारे नाशिकचे आमदार ‘रूंगठा’च्या बळीवर गप्प का? पोलिसांचा ‘काटेकोर’ दणका; आता विधानसभेत आवाज घुमणार?

■ सुला रोड अपघातात मंत्र्यांची गर्जना आणि पोलिसाचे निलंबन; मग बांधकाम साईटवरील मजुराच्या मृत्यूनंतर ‘रूंगठा ग्रुप’ला अभय का?

■ नाशिक पोलीस आयुक्तांचा ‘सिंघम’ अवतार; घटनेचे गांभीर्य ओळखून थेट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश !

■ मयत मजुर बंगाली की ‘बांगलादेशी’? घुसखोरीच्या अँगलने तपासाची मागणी जोर धरू लागली ! 

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२६:- सुला रोडवरील त्या थरारक मृत्यूप्रकरणी आमदार सीमा हिरेंनी विधानसभेत आवाज उठवला, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी “कोणालाही सोडणार नाही” अशी गर्जना केली आणि हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसाचे तडकाफडकी निलंबन झाले. मात्र, आता नाशिकच्या आरडी सर्कलवर (गोविंदनगर) ललित रूंगंठा ग्रुपच्या साईटवर जो रक्ताचा खेळ झाला, त्यात एका मजुराचा बळी गेला आणि दोघे मृत्यूशी झुंज देत आहेत. यावर नाशिकचे कारभारी आमदार मूग गिळून गप्प का? असा संतप्त सवाल नाशिककर विचारत आहेत.

पोलिस आयुक्तांची धडक कारवाई: ‘AD’ नव्हे, आता थेट मनुष्यवध !

सुरुवातीला मुंबई नाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (AD) नोंद झाली असली, तरी नाशिक पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाचे गांभीर्य त्वरित ओळखले. बिल्डर लॉबीच्या दबावाला बळी न पडता, “ही साधी दुर्घटना नसून सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली आहे,” हे हेरून आयुक्तांनी तातडीने मनुष्यवधाचा (Culpable Homicide) गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या या सकारात्मक आणि आक्रमक भूमिकेमुळे मुजोर बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत. आता चेंडू लोकप्रतिनिधींच्या कोर्टात आहे.

आमदार साहेब, आता ‘रूंगंठा’ विरोधात आवाज उठवणार का?

सुला रोडवर एका मद्यधुंद चालकाच्या विरोधात रान उठवणारे आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढेकले आणि आमदार सरोज अहिरे या प्रकरणात बिल्डर लॉबीला पाठीशी घालणार की मजुराच्या न्यायासाठी विधानसभेत कडाडणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

 सुला रोडवर तत्परता दाखवली, तशीच तत्परता इथेही दाखवून रूंगठा ग्रुपच्या मालकांवर कठोर कारवाईची मागणी तुम्ही करणार का?

 सुयश हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देणाऱ्या त्या दोन जखमी मजुरांचे काय?

मयत मजुर ‘बंगाली’ की ‘बांगलादेशी’?

पोलिसांनी या तपासात आणखी एक धक्कादायक पैलू तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. मयत नागेंद्र सत्यनारायण यादव आणि जखमी मजुर हे पश्चिम बंगालचे आहेत की बांगलादेशी घुसखोर? स्वस्त लेबरच्या नादात बिल्डर अनधिकृत बांगलादेशी मजुरांचा वापर करत आहेत का? याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

घटनेची भयावहता:

ललित रूंगठा ग्रुपच्या साईटवर ‘सेफ्टी पर्पल’ (सुरक्षा मानके) पायदळी तुडवले गेले. मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून नागेंद्र यादवचा (वय २४) तडफडून मृत्यू झाला. ही दुर्घटना नसून बिल्डरच्या नफेखोरीने घेतलेला बळी आहे, हे स्पष्ट होत असतानाच नाशिक पोलिसांनी घेतलेली ‘मनुष्यवधाचा गुन्हा’ दाखल करण्याची भूमिका कौतुकास्पद ठरली आहे.

जनतेचा सवाल:

सुला रोडच्या अपघातानंतर जसे शासन आणि प्रशासन हलले, तसेच या गरीब मजुराच्या मृत्यूनंतरही हलणार का? की श्रीमंत बिल्डर पुन्हा एकदा ‘टेबल खालून’ सुटणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

सद्यस्थिती:

आरोपी: साईट इंजिनिअर व जबाबदार ठेकेदार/बिल्डर (तपासाधीन)

पोलीस ॲक्शन: कलम (सदोष मनुष्यवध) अंतर्गत कारवाईची दिशा.

प्रतीक्षा: नाशिकच्या ४ आमदारांच्या आक्रमक भूमिकेची!

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!