पोलिसांशी संवाद आता थेट घरबसल्या! नाशिक पोलीस दलाचा क्रांतिकारी ‘ई-मीट’ उपक्रम सुरू

ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा; तक्रारी व सूचनांसाठी पोलीस आयुक्तालयात येण्याची गरज नाही

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१४:-पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्यातील संवाद अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्यासाठी नाशिक शहर पोलीस दलाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आता नाशिकमधील कोणताही नागरिक आपल्या तक्रारी, समस्या किंवा सूचना थेट पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी ऑनलाइन भेटीची वेळ घेऊ शकणार आहे. ‘ई-मीट’ नावाच्या या अभिनव सेवेमुळे नागरिकांना पोलीस आयुक्तालयात प्रत्यक्ष येण्याची गरज भासणार नाही.

नाशिक शहर पोलिसांच्या   http://nashikcitypolice.gov.inया अधिकृत संकेतस्थळावर ही ‘ई-मीट’ सेवा सुरू करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाचा अचूक वापर करत पोलीस-नागरिक संबंध दृढ करण्याचा हा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद मानला जात आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा एक वरदान ठरणार असून, त्यांना आता घरातूनच सुरक्षितपणे आपले म्हणणे मांडता येणार आहे.

या उपक्रमामुळे प्रशासकीय कामात गतिमानता येईल आणि नागरिकांचा वेळही वाचेल. दररोज उपलब्ध असणाऱ्या दिनांक आणि वेळेच्या पर्यायांमधून नागरिक आपल्या सोयीनुसार वेळ निवडू शकतात.

एका क्लिकवर साधा आयुक्तांशी संवाद!

ई-मीट अशी बुक करा:

1. नाशिक पोलिसांच्या http://nashikcitypolice.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या आणि ई-मीटद्वारे संवाद साधा’ या बटणावर क्लिक करा.

2. आपल्या सोयीनुसार उपलब्ध दिनांक आणि वेळेचा पर्याय निवडा.

3. चर्चेचा विषय, आपले नाव आणि संपर्क तपशील भरा व

‘शेड्यूल मीटिंग‘ बटणावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला ऑनलाइन मीटिंगची लिंक आणि पुढील माहिती तुमच्या संपर्क क्रमांकावर दिली जाईल.

या क्रांतिकारी बदलामुळे नाशिक शहर अधिक सुरक्षित आणि नागरिक-स्नेही बनण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे…

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!