उत्तमनगरचा ‘दादा’ आता नाशिकच्या वेशीबाहेर! पोलिसांच्या धडक कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले!

लाल 🚨 दि्वा-नाशिकदि.३०:-, (विशेष प्रतिनिधी): उत्तमनगर आणि सिडको परिसरात आपल्या गुन्हेगारी कृत्यांनी दहशत माजवणारा कुख्यात गुंड अनिकेत उर्फ ‘बाल्या’ दातखिळे याच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. रक्ताच्या थारोळ्यात लोळवण्याची धमकी देणारा, जीवघेणे हल्ले करणारा आणि शस्त्र दाखवून सामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या या ‘बाल्या’ला नाशिक शहर पोलिसांनी तब्बल दोन वर्षांसाठी शहरातून तडीपार केले आहे. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या ‘क्राईम फ्री नाशिक’ मोहिमेअंतर्गत उचललेले हे पाऊल म्हणजे गुन्हेगारी जगताला दिलेला एक सज्जड इशारा मानला जात आहे.

काय होती ‘बाल्या’ची दहशत?

अनिकेत उर्फ बाल्या गोरख दातखिळे, वय अवघे २४ वर्षे, पण त्याच्या नावावर असलेले गुन्हे अंगावर काटा आणणारे आहेत. भररस्त्यात गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करणे, शस्त्रे बाळगून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, मालमत्तेचे नुकसान करणे आणि शस्त्र दाखवून “कापून टाकेन” अशा धमक्या देणे हे त्याचे नित्याचेच उद्योग होते. त्याच्या दहशतीमुळे अनेक नागरिक उघडपणे तक्रार करण्यासही धजावत नव्हते. मात्र, पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आणि दोन धाडसी साक्षीदारांच्या मदतीने त्याच्या गुन्हेगारीचा संपूर्ण लेखाजोखा तयार केल

शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांच्याच आदेशानुसार, परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त श्री. किशोर काळे यांनी गुन्हेगारांची कुंडलीच बाहेर काढली. ‘बाल्या’ दातखिळे याच्या वाढत्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. श्री. काळे यांनी या प्रस्तावाची स्वतः चौकशी पूर्ण करून, ‘बाल्या’ला दि. ३०/१०/२०२५ पर्यंत नाशिक शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा धडाकेबाज आदेश जारी केला.

आगामी सण, उत्सव आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता टिकवून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आता ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. ‘बाल्या’वरील कारवाई ही केवळ सुरुवात असून, शहरात वारंवार गुन्हे करणाऱ्या गुंडांवर हद्दपारी, स्थानबद्धता आणि प्रसंगी ‘मोक्का’सारखी कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. गुन्हेगारांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्यांनीही वेळीच सुधारावे, अन्यथा त्यांचीही गय केली जाणार नाही, असे प्रशासनाने ठणकावले आहे.

पोलीस उपायुक्त श्री. किशोर काळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “हद्दपार केलेला ‘बाल्या’ दातखिळे किंवा इतर कोणताही संशयित गुन्हेगार परिसरात दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल. तुमच्या एका खबरीमुळे मोठे गुन्हे टळू शकतात. निर्भिडपणे पुढे या आणि पोलिसांना सहकार्य करा.”

या कारवाईमुळे सिडको आणि उत्तमनगर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, नाशिक पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!