- मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी; राज्याच्या विकासाला चालना.
- जपानचे भारतातील राजदूत ओनो केईची यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट, सहकार्य
लाल 🚨 दिवा-मुंबई,दि.२९ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या विकासाला चालना देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये ग्रामीण भागाच्या सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’, महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘उमेद मॉल’ आणि शेतकऱ्यांना शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी कायद्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
मंत्रिमंडळ निर्णयातील प्रमुख ठळक मुद्दे:
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान: २९० कोटींची तरतूद
राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्यात येणार आहे. यासाठी दरवर्षी २९० कोटी रुपयांच्या पुरस्कारांची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत राज्यस्तरावर उत्कृष्ट ग्रामपंचायतीला ५ कोटी रुपयांचे पहिले बक्षीस दिले जाईल
.
महिला बचत गटांसाठी १० जिल्ह्यांत ‘उमेद मॉल‘
ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ उभारले जाणार आहेत. यासाठी २०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. प्रत्येक मॉलसाठी २० कोटी रुपयांपर्यंत खर्च केला जाईल.
शेतमालाला रास्त भाव: ‘ई-नाम’साठी कायद्यात सुधारणा
शेतकऱ्यांना ‘ई-नाम’ योजनेचा प्रभावी लाभ मिळावा आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे ‘सिंगल युनिफाइड लायसन्स’ची तरतूद होऊन आंतरराज्यीय व्यापार सुलभ होईल.
न्यायदान गतिमान करण्यासाठी नवे उपक्रम
- महिला अत्याचाराचे खटले वेगाने निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालये स्थापन केली जाणार आहेत.
- पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली, ज्यामुळे स्थानिक नागरिकांची सोय होणार आहे.
इतर महत्त्वाचे निर्णय
- वर्धा जिल्ह्यातील ‘बोर’ आणि ‘धाम’ या सिंचन प्रकल्पांच्या नूतनीकरणासाठी ४२८.९६ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता.
- महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेला ‘ॲडव्होकेट अकॅडमी’साठी ठाण्यातील कळवा येथे जमीन देण्याचा निर्णय.
- महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांचे मंत्रिमंडळाकडून अभिनंदन करण्यात आले.
राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी
ठाणे जिल्हा रुग्णालय MMR साठी वरदान ठरेल – उपमुख्यमंत्री शिंदे
ठाणे जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून ते नागरिकांसाठी लवकर खुले करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ९०० खाटांच्या या रुग्णालयासाठी १०७८ नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तसेच राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
डॉ. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा होणार
हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस ७ ऑगस्ट हा दरवर्षी ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केली. या निमित्ताने सर्व कृषी विद्यापीठांमध्ये ‘डॉ. एम. एस. स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर’ स्थापन केले जाणार आहे.
राज्यपाल्यांच्या हस्ते १०६ पोलिसांना पदके प्रदान


राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवनात झालेल्या समारंभात १०६ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस शौर्य पदक, राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली.
उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार जाहीर
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी २०२३-२४ या वर्षासाठीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर केले. पुरस्कार वितरण सोहळा १२ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत होणार आहे.
३ ते १५ ऑगस्ट दरम्यान अवयवदान पंधरवडा
राज्यात ३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवयवदान पंधरवडा राबविण्यात येणार असून, त्याचे नियोजन प्रभावीपणे करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त उद्या परिसंवाद
जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त (३० जुलै) राज्य महिला आयोगातर्फे “संवेदनशीलता ते संकल्प:







