पोलिसांच्या इभ्रतीचा पंचनामा करणारा पोक्सोचा आरोपी अखेर जेरबंद !

नाशिक पोलिसांचा ‘सिंघम’ स्टाईल कमबॅक; पवननगर चौकीतून पलायनाचा थरार ते सिडकोत पाठलाग करून मुसक्या आवळण्याचा ‘सिनेमॅटिक’ शेवट!

२४ तासांच्या आत थरारनाट्यावर पडदा: गुप्त बातमीदाराची माहिती ठरली निर्णायक!

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.११:- (विशेष प्रतिनिधी):नाशिक शहरात शनिवारी सायंकाळी पवननगर पोलीस चौकीतून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला आणि संपूर्ण पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा पोक्सोचा क्रूरकर्मा आरोपी अतुल उर्फ लिंब्या प्रकाश तुंबडे याच्या मुसक्या आवळण्यात अखेर अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशा थरारक पाठलागानंतर आरोपीला सिडको परिसरातून ताब्यात घेण्यात आले, ज्यामुळे नाचक्कीने मान खाली गेलेल्या पोलीस दलाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

असा घडला होता पलायनाचा थरार

शनिवारी दुपारी अंबड पोलिसांनी पोक्सोच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अतुल तुंबडे याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सायंकाळी ५:३० च्या सुमारास, पोलीस अंमलदार अशोक शिरकांडे, अरुण चव्हाण आणि होमगार्ड पथक आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे घेऊन जात होते. पवननगर पोलीस चौकीच्या आवारात पोहोचताच, धूर्त आरोपी अतुलने पोलीस अंमलदार शिरकांडे यांच्या हाताला जोराचा झटका दिला आणि त्यांच्या नजरेतून सुटून क्षणार्धात पळ काढला. या अनपेक्षित प्रकारामुळे पोलिसांची प्रचंड तारांबळ उडाली आणि शहरात एकाच खळबळ माजली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आरोपी अतुल तुंबडे विरोधात कायदेशीर रखवालीतून पळून गेल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम २६२ अन्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आणि सुरू झाली प्रतिष्ठेची लढाई…

आरोपीच्या पलायनाने पोलीस दलाची मोठी नाचक्की झाली होती. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त श्री. किशोर काळे, आणि सहायक पोलीस आयुक्त श्री. शेखर देशमुख यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीला कोणत्याही परिस्थितीत शोधून काढण्याचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड यांच्या नेतृत्वात अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही प्रतिष्ठेची लढाई जिंकण्यासाठी कंबर कसली. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून आरोपीचे सर्व संभाव्य मार्ग रोखण्यात आले.

गुप्त बातमीदार ठरला ‘देवदूत’

पोलिसांची पथके शहरभर आरोपीचा शोध घेत असताना, गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार मयुर पवार यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून एक खणखणीत माहिती मिळाली. फरार आरोपी अतुल उर्फ लिंब्या हा सिडकोतील हेडगेवार चौकाजवळील पाणी फिल्ट्रेशन प्लांट परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर बातमी मिळताच, वेळ न दवडता गुन्हे शोध पथकाने सापळा रचला.

सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, योगेश देसले, मयुर पवार, सचिन करंजे, अनिल गाढवे, तुषार मते, संजय सपकाळे, आणि राकेश पाटील यांच्या पथकाने सदर परिसरात धडक दिली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पुन्हा पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र अत्यंत शिताफीने आणि धाडसाने पाठलाग करत पोलिसांनी त्याला घेरले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या.

आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला पुढील तपासासाठी सहायक पोलीस निरीक्षक सविता उंडे यांच्या हवाली करण्यात आले. एक

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!