निवडणूक कर्मचाऱ्यांच्या मानधनात मोठी वाढ! दुप्पट पगार, जेवणातही सुधारणा!

मानधन वाढले, आनंदाला उधाण! निवडणूक कामगार म्हणाले “धन्यवाद आयोग”!

लाल 🚨 दिवा-नवी दिल्ली ,दि.८:– निवडणूक आयोगाने निवडणूक अधिकारी, मतदान अधिकारी, मतमोजणी कर्मचारी, मायक्रो निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांचे मानधन वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. २०१४ ते २०१६ दरम्यान मानधनात शेवटचा मोठा बदल करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा मानधनवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.  

  • काय आहेत बदल?

पगारात दुपटीने वाढ करण्यात आली असून, पीठासीन अधिकाऱ्यांना आता दिवसाला ५०० रुपये किंवा एकरकमी २००० रुपये मिळणार आहेत. मतदान अधिकाऱ्यांना ४०० रुपये किंवा १६०० रुपये तर मतमोजणी सहाय्यकांना ४५० रुपये किंवा १३५० रुपये मिळणार आहेत. वर्ग ४ कर्मचाऱ्यांचा पगारही ३५० रुपये किंवा १४०० रुपये इतका करण्यात आला आहे. याशिवाय जेवणाचा भत्ताही १५० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आला आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांना आता पॅक जेवण आणि हलका नाश्ताही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  • उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही लाभ

उप जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना एक महिन्याच्या मूलभूत पगाराएवढे मानधन देण्यात येणार आहे. सीएपीएफच्या गॅझेटेड अधिकाऱ्यांना १५ दिवसांसाठी ४००० रुपये आणि त्यानंतर आठवड्याला २००० रुपये मिळणार आहेत. कनिष्ठ अधिकाऱ्यांना अनुक्रमे ३००० आणि १५०० रुपये तर इतर कर्मचाऱ्यांना १५०० आणि १२५० रुपये मिळतील. व्यय निरीक्षक, क्षेत्र अधिकारी आणि क्षेत्रीय पोलीस अधिकाऱ्यांचे मानधन ७५०० रुपयांवरून १०००० रुपये करण्यात आले आहे.

  • कर्मचाऱ्यांमध्ये आनंद

निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. दीर्घकाळ काम करणाऱ्या आणि अथक परिश्रम घेणाऱ्या निवडणूक यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना यामुळे योग्य मोबदला मिळेल अशी अपेक्षा आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!