नाशिक पोलिसांचा ‘सिंघम’ स्टाईल दणका! धार्मिक भावनांशी खेळणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवळल्या; संपूर्ण ‘ड्रीम टीम’चे सर्वत्र कौतुक!

गुन्हे शाखा युनिट १ ची चित्तथरारक कारवाई; एका खबरीवरून ३ गुन्हे उघड, साडेतीन लाखांचा ऐवज जप्त!

लाल 🚨 दिवा नाशिक,दि.१२:- (विशेष प्रतिनिधी): शहराची शांतता आणि धार्मिक सलोखा धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांना नाशिक शहर पोलिसांनी जबरदस्त चपराक लगावली आहे. जैन समाजाच्या भावनांशी निगडित असलेल्या कुंथूनाथ जैन मंदिरातील मूर्ती आणि दानपेट्या चोरणाऱ्या सराईत त्रिकुटाला गुन्हे शाखा युनिट १ च्या ‘ड्रीम टीम’ने अत्यंत शिताफीने जेरबंद केले आहे. केवळ एका विश्वासू खबरीच्या माहितीवरून रचलेल्या सापळ्यात आरोपी अडकले आणि एकाच वेळी तब्बल तीन गंभीर गुन्हे उघडकीस आले. या धडाकेबाज कामगिरीत पोलिसांनी एकूण ३,५८,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

शरणपूर रोडवरील जैन मंदिरात झालेल्या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त  संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे)   किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते.

या आदेशानुसार, गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपास सुरू असतानाच, युनिटचे अत्यंत चाणाक्ष पोलीस हवालदार प्रशांत मरकड आणि पोलीस अंमलदार अमोल कोष्टी यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून एक अचूक आणि पक्की खबर मिळाली. “मंदिरातील चोरीचा माल गोणीत भरून दोन चोरटे शाईन मोटारसायकलवरून आसाराम बापू पुलावरून नाशिककडे येत आहेत,” ही ती निर्णायक माहिती होती.

या माहितीनंतर एका क्षणाचाही विलंब न लावता, पोउनि/चेतन श्रीवंत आणि पोउनि/सुदाम सांगळे यांनी आपल्या पथकासह आसाराम बापू पुलाजवळ सापळा रचला. खबऱ्याने वर्णन केल्याप्रमाणे मोटारसायकल येताच, पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विशाल सांगळे आणि शिवा डोंगरे या दोघांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी तिसरा साथीदार लकी भंडारे याचे नावही कबूल केले.

एका गुन्ह्याच्या तपासात उलगडले पापांचे जाळे!

आरोपींच्या चौकशीत केवळ जैन मंदिरातील चोरीच नव्हे, तर गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन घरफोडीचे गुन्हेही उघडकीस आले. या त्रिकुटाकडून पोलिसांनी एकूण ३,५८,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाणे करीत आहे.

ही नेत्रदीपक कामगिरी यशस्वी करणारी ‘ड्रीम टीम’

ही चित्तथरारक आणि कौतुकास्पद कामगिरी पोलीस आयुक्त  संदिप कर्णिक पोलीस उप-आयुक्त  किरणकुमार चव्हाण आणि मा. सहा. पोलीस आयुक्त  संदिप मिटके यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली खालील अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी यशस्वी करून दाखवली वरिष्ठ पोलीस निरीक्षक: मधुकर कड पोलीस उप-निरीक्षक: चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे पोलीस हवालदार: प्रविण वाघमारे, संदिप भांड, प्रशांत मरकड, नाजीमखान पठाण, विशाल काठे, मिलींदसिंग परदेशी, प्रदीप म्हसदे, रोहिदास लिलके, उत्तम पवार, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, कैलास चव्हाण, राजेश लोखंडे, सुकाम पवार (चालक) पोलीस अंमलदार:अमोल कोष्टी, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, राम बर्डे, गोरक्ष साबळे, समाधान पवार (चालक)महिला पोलीस हवालदार: उर्मिला कोकणी, अनुजा येलवे

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!