अन्यायाच्या अंधारात खाकी वर्दी बनली रक्षणकर्ती ढाल! लेकी-बाळींच्या अब्रूवर आणि धर्मावर घाला घालणाऱ्यांचा नाशिक पोलिसांनी काढला कोथळा; धडक कारवाईवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसही फिदा!

अश्रू पुसले, अस्मिता जपली, गुन्हेगारांची झोप उडवली! हिंदू महिलांचे धर्मांतर आणि शोषण रोखणाऱ्या नाशिक पोलिसांवर राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव, गृहमंत्र्यांनीही अभिमानाने थोपटली पाठ!

लाल 🚨 दिवा-नाशिक, (विशेष प्रतिनिधी):नाशिकच्या एका चकचकीत बहुराष्ट्रीय टेक्नॉलॉजी कंपनीच्या काचेच्या भिंतींमागे चाललेला धर्मांतर आणि महिलांच्या लैंगिक शोषणाचा अत्यंत भयंकर प्रकार नाशिक पोलिसांनी उघडकीस आणला आहे. हिंदू महिलांवर दबाव टाकून त्यांच्या धार्मिक अस्मितेवर घाला घालणाऱ्या आणि त्यांचे शोषण करणाऱ्या या रॅकेटचा नाशिक पोलिसांनी पार कोथळाच बाहेर काढला. पोलिसांच्या या अत्यंत वेगवान आणि आक्रमक कारवाईची दखल थेट राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, त्यांनी नाशिक पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची भक्कम थाप दिली आहे. 

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलिसांचे सविस्तर कौतुक:

एका नामांकित आयटी / टेक कंपनीत उच्चशिक्षित महिलांसोबत घडलेला हा प्रकार राज्याला हादरवून सोडणारा होता. मात्र, गुन्हेगारांना जराही वेळ न देता नाशिक पोलिसांनी ज्या तत्परतेने कारवाई केली, त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमावर आणि प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलिसांच्या कारवाईचे विशेष कौतुक केले. 

गृहमंत्री फडणवीस आपल्या प्रतिक्रियेत म्हणाले: 

नाशिक पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि पोलिसांनी अत्यंत धैर्याने हे उघडकीस आणले आहे. अशा प्रकारच्या एका टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी महिलांवर दबाव आणून त्यांचे धर्मांतरण आणि लैंगिक शोषण केले, हे फारच धक्कादायक आहे. या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी नाशिक पोलिसांनी अतिशय वेगाने जी कारवाई केली आहे, त्याबद्दल मी पोलिसांचे त्या ठिकाणी विशेष कौतुक करेन. त्यांनी एका मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे.”*

गृहमंत्र्यांच्या या सविस्तर प्रतिक्रियेमुळे नाशिक शहर पोलीस दलाचे मनोबल उंचावले असून, महिलांच्या सुरक्षेसाठी शासन आणि प्रशासन किती खंबीरपणे उभे आहे, याचा स्पष्ट संदेश संपूर्ण राज्याला गेला आहे.

काय आहे नेमका संदर्भ? काय घडले टेक कंपनीत?

नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काही विकृत पुरुष कर्मचाऱ्यांनी अक्षरशः राक्षसी प्रवृत्तीने हिंदू महिला कर्मचाऱ्यांवर अन्याय सुरू केला होता. महिलांचे केवळ लैंगिक आणि मानसिक शोषणच नव्हे, तर त्यांच्या ‘हिंदू’ धार्मिक भावनांवर अत्यंत नीच पद्धतीने आघात करण्याचे कृत्य येथे सुरू होते. हिंदू धर्माच्या प्रथा-परंपरांचा जाणीवपूर्वक अपमान करणे आणि महिलांवर दबाव आणून त्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न करणे, असे हे भयानक षड्यंत्र होते. मात्र, नाशिक पोलिसांनी या प्रकरणात ९ गुन्हे दाखल करत ६ नराधमांच्या मुसक्या आवळल्या आणि हा संपूर्ण कट उधळून लावला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्वरित ‘विशेष तपास पथक’ (SIT) गठीत केले.

गुन्हे शाखेचा तपास वेगात: पुण्यातील महिला आरोपी ताब्यात

या गंभीर प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी एसआयटी (SIT) कडून अत्यंत सखोल तपास सुरू आहे. या तपासाबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी सांगितले की:

“मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हा रजि. नं. १६३/२०२६ मध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम ७५, ७८, ७९, ४९, ३५६, ३(५) अन्वये कारवाई करण्यात येत आहे. या गुन्ह्याच्या तपासाकामी महिला आरोपी आश्विनी अशोक चैनानी (वय ५१ वर्ष, रा. फ्लॅट नं. २, प्रकाश अपार्टमेंट, लुला नगर, पुणे) हिला ताब्यात घेण्यात आले होते. सदर महिलेकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कसून तपास करण्यात आला असून, महिला आरोपीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम ३५(३) मधील तरतुदींनुसार कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.”

सर्व कंपन्यांना सज्जड दम आणि महिलांना अभय

गृहमंत्र्यांच्या कौतुकानंतर आणि पोलिसांच्या धडक कारवाईनंतर शहरातील सर्व खाजगी आस्थापना आणि कंपन्यांना पोलिसांकडून कडक ताकीद देण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

तसेच, पोलीस आयुक्तांनी सर्व महिलांना आवाहन केले आहे की, नोकरीच्या ठिकाणी असा कोणताही त्रास (विनयभंग, धर्मांतराचा दबाव किंवा धार्मिक भावना दुखावणे) होत असल्यास घाबरू नका. थेट पोलिसांशी संपर्क साधा. 

व्हॉट्सॲप नंबर: ९९२३३२३३११ (CP WhatWhatsApp Number) 

हेल्पलाईन: ११२ 

तक्रारदाराची ओळख १००% गोपनीय ठेवली जाईल.

नाशिक पोलिसांच्या या ‘सिंघम’ कामगिरीने आणि गृहमंत्र्यांनी दिलेल्या पाठबळाने हे सिद्ध केले आहे की, महाराष्ट्रात महिलांच्या सन्मानाशी आणि

धार्मिक अस्मितेशी खेळणाऱ्यांना कायद्याचा जबरदस्त दणका बसल्याशिवाय राहणार नाही!

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!