नाशिक राष्ट्रवादीत ‘विक्रांत’ पर्वाला सुरुवात! धडाकेबाज नेते विक्रांत डहाळे यांच्या खांद्यावर शहर जिल्हा कार्याध्यक्षपदाची धुरा!

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची मोठी खेळी; सर्वसामान्यांच्या ‘आक्रमक’ आवाजाला पक्षश्रेष्ठींकडून मानाचे पान!

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२० (आमच्या प्रतिनिधीकडून):राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या नाशिक शहर जिल्हा राजकारणात एका नव्या वादळाची नांदी झाली आहे. पक्षाचे आक्रमक आणि लोकप्रिय नेते, गोरगरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे श्री. विक्रांत डहाळे यांची शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याची लाट उसळली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली, ज्यामुळे या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

यापूर्वी विभाग अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या डहाळे यांच्या कामाची ही पोचपावती मानली जात आहे. गोरगरिबांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची धडाडी, अन्यायाविरोधात बुलंद आवाज आणि अहोरात्र जनसेवेचा ध्यास या त्यांच्या गुणांमुळेच पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर हा मोठा विश्वास टाकला आहे. एका सामान्य कार्यकर्त्याला थेट कार्याध्यक्षपदी बढती देऊन पक्षाने पुन्हा एकदा कर्तृत्वाला सलाम केला आहे.

आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डहाळे यांची निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यांच्या आक्रमक शैलीमुळे पक्षाच्या मोर्चेबांधणीला नवी ऊर्जा मिळेल आणि तरुणांची मोठी फळी पक्षाशी जोडली जाईल, असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

या ऐतिहासिक निवड प्रसंगी पक्षाध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुलोचनाताई पवार, आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे, शहराध्यक्ष गजानन नाना शेलार, रोहित पाटील, महेबूब शेख, मुन्नाभाई अन्सारी, विजय मटाले, समाधान कोठुळे, अशोक बिडलान, दीपक ठाकरे, यश बागुल, साखर ठाकरे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. सर्वच वरिष्ठ नेत्यांनी डहाळे यांना शुभेच्छा देत त्यांच्या भावी वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या. डहाळे यांच्या निवडीमुळे नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मोठी झेप घेईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!