मालेगाव पोलिसांचा ‘मिडनाईट हंट’! १० लाखांच्या बनावट नोटांच्या ‘डेथ वॉरंट’वर बाळासाहेब पाटलांची सही!

खाकीच्या थरारक सापळ्यात अडकले परराज्यातील सूत्रधार; भारतीय अर्थव्यवस्थेवरील महासंकट टळले !

लाल 🚨 दिवा-मालेगाव, विशेष प्रतिनिधी दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ ची ती काळोखी रात्र… मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांची तुरळक वर्दळ आणि आसमंतात पसरलेला गूढ सन्नाटा. याच शांततेला भेदून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुळावर घाव घालणारा एक महाभयानक कट शिजत होता. पण त्यांना कल्पना नव्हती की, नाशिक ग्रामीणचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांच्या ‘ऑपरेशन क्लीन-अप’ची तीक्ष्ण नजर त्यांच्या प्रत्येक हालचालीवर रोखलेली आहे! श्री. पाटील यांनी गुन्हेगारीमुक्त जिल्ह्याचे जे स्वप्न पाहिले आहे, त्याला साकार करण्यासाठी मालेगाव तालुका पोलिसांचे एक धाडसी पथक काळोखात दबा धरून बसले होते.

नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या गुप्तचर यंत्रणेला एक अत्यंत स्फोटक माहिती मिळाली. मध्य प्रदेशातील बुरहानपुर येथील दोन सराईत गुन्हेगार तब्बल १० लाख रुपयांच्या बनावट नोटांची खेप घेऊन मालेगावच्या हद्दीत प्रवेश करणार होते. ही माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी थेट मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक श्री. तेगबीर सिंह संधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. यशवंत बाविस्कर यांना कारवाईचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक श्री. प्रितम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता महामार्गावरील ए-वन सागर हॉटेल परिसरात अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचला.

…आणि काळजाचा ठोका चुकवणारी कारवाई !

मध्यरात्रीच्या सुमारास, दोन इसम एका काळ्या-चॉकलेटी रंगाच्या बॅगेसह अत्यंत संशयास्पदरीत्या हॉटेल परिसरात घुटमळताना दिसले. त्यांच्या डोळ्यांतील भीती आणि देहबोलीतील अस्वस्थता अनुभवी पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही. जसा दबा धरून बसलेला सिंह आपल्या शिकारीवर झडप घालतो, त्याच विजेच्या वेगाने पोलीस पथकाने चारी बाजूंनी दोघांनाही घेरले. अनपेक्षित हल्ल्याने भांबावलेल्या आरोपींनी पळ काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, पण तोपर्यंत त्यांच्या हातावर खाकीचा मजबूत पंजा पडला होता.

नाजिर अक्रम मोहम्मद अय्यूब अन्सारी (वय ३४) आणि मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी (वय ३३) अशी त्यांची नावे समोर आली. त्यांची झडती घेतली असता, त्या बॅगेत जे सापडले ते पाहून पोलीसही चक्रावले. आतमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचे थरावर थर रचलेले होते. हुबेहूब खऱ्या दिसणाऱ्या, पण तितक्याच घातक अशा तब्बल २००० बनावट नोटा! म्हणजेच, पूर्ण १० लाख रुपयांचे बनावट चलन! या नोटा बाजारात पसरल्या असत्या, तर किती मोठे आर्थिक संकट उभे राहिले असते, याची कल्पनाही करवत नाही.

बाळासाहेब पाटलांच्या नेतृत्वाला सलाम!

ही केवळ एक कारवाई नाही, तर पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांच्या दूरदृष्टी आणि कठोर भूमिकेचा हा विजय आहे. त्यांनी अवैध धंद्यांविरोधात पुकारलेल्या निर्णायक लढ्यामुळेच आज नाशिक ग्रामीण पोलीस दल गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी, सपोनि प्रिती सावंजी, पोउनि तुषार भदाणे, पोहवा अमोल शिंदे, प्रकाश बनकर, पोकॉ गणेश जाधव, मोरे यांच्या टीमने ही जीवाची बाजी लावून केलेली कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे.

आरोपींना ८ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून, या बनावट नोटांचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा छडा लावण्याचे आव्हान आता पोलिसांपुढे आहे. मात्र, या कारवाईने एक गोष्ट सिद्ध केली आहे – नाशिक ग्रामीण पोलिसांच्या नजरेतून कोणताही गुन्हेगार सुटू शकत नाही

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!