खळबळजनक! ‘ओम प्रमाणपत्र’ मोहिमेमुळे महंत डॉ. अनिकेतशास्त्री महाराजांच्या जीवाला धोका; इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या!

हिंदू व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या कार्यामुळे कट्टरतावादी संतप्त; मुख्यमंत्र्यांकडे संरक्षणासाठी धाव, पालघरच्या पुनरावृत्तीची भीती.

लाल 🚨 दिवा नाशिक, प्रतिनिधी:हिंदू सण-उत्सव आणि तीर्थक्षेत्रांवर हिंदू व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ओम प्रमाणपत्र’ ही अभिनव संकल्पना राबवणारे सुप्रसिद्ध महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांना इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्या ‘ओम प्रतिष्ठान’च्या कार्यामुळे हिंदूंमध्ये होत असलेली जागृती काही समाजविघातक शक्तींच्या डोळ्यात खुपत असून, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर प्राणघातक हल्ले करण्याचा प्रयत्न झाला आहे. या गंभीर प्रकारामुळे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सचिव श्रीकर परदेशी यांच्याकडे तातडीने पोलीस संरक्षण मिळवण्यासाठी धाव घेतली आहे.

काय आहे ‘ओम प्रमाणपत्र’ मोहीम?

महंत डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदूंची मंदिरे आणि सण-उत्सवांच्या ठिकाणी अनेकदा अन्य धर्मीय, विशेषतः मुसलमान व्यावसायिक पूजा साहित्य आणि प्रसादाची दुकाने थाटतात. या साहित्यामध्ये भेसळ करून हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळण्याचा आणि आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आणि हिंदू व्यावसायिकांना सक्षम करण्यासाठी ‘ओम प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात आली. या प्रतिष्ठानतर्फे केवळ हिंदू व्यावसायिकांना ‘ओम प्रमाणपत्र’ दिले जाते. त्यामुळे भाविक खात्रीशीर आणि शुद्ध पूजा साहित्य खरेदी करू शकतात. महाराजांच्या या मोहिमेला संपूर्ण भारतातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, त्यामुळेच काही कट्टरतावादी गट संतप्त झाले आहेत.

नाशिक-पुणे महामार्गावर झाला होता हल्ला

महंत डॉ. अनिकेतशास्त्री यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात एका भयंकर घटनेचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात, “सुमारे चार महिन्यांपूर्वी रात्री एकच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर हजारोच्या संख्येने जमलेल्या मुस्लिम जमावाने माझी गाडी अडवून काचा फोडल्या आणि मला जीवे मारण्याचा निर्घृण प्रयत्न केला.” याशिवाय, आश्रमात आणि प्रवचन कार्यक्रमांमध्ये अनोळखी व्यक्तींकडून धमक्या मिळण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. भारतातील दुर्गम भागात धर्मप्रसाराचे कार्य करत असताना आणि ‘ओम प्रमाणपत्रा’चे वितरण करत असताना अनेक ठिकाणी जीवाला धोका निर्माण झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

पोलीस संरक्षण मिळते, पण…

या धमक्यांविषयी पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे वेळोवेळी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. प्रत्येक वेळी पोलिसांनी २-३ दिवसांचे संरक्षण पुरवले, परंतु महाराजांचे कार्य भारतभर पसरलेले असल्यामुळे हे संरक्षण अपुरे पडत आहे. “पालघरमध्ये साधूंची झालेली हत्या सर्वांना आठवत असेल. माझ्यासोबतही तसा प्रकार घडू शकतो,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनीही तीव्र चिंता व्यक्त केली असून, “राज्य सरकारने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन महंत डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांना कायमस्वरूपी आणि पुरेसे संरक्षण द्यावे,” अशी जोरदार मागणी केली आहे.

“सर्व धर्म समभाव ही संकल्पनाच मुळात चुकीची!” – महंत डॉ. अनिकेतशास्त्री महाराज

“ज्या धर्मात मूर्तीपूजा ‘हराम’ मानली जाते, जिथे हिंदूंच्या देवी-देवतांना ‘सैतान’ म्हटले जाते, त्यांना हिंदू धर्माविषयी काडीमात्र आस्था असू शकत नाही. अशा लोकांनी हिंदू धर्माशी संबंधित व्यवसाय करण्याचा नैतिक अधिकार काय? प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असला पाहिजे. सनातन धर्माचे पालन करणे ही आपली जबाबदारी आहे. यापुढे हिंदू बांधवांनी कोणतीही वस्तू खरेदी करताना ती ‘ओम प्रमाणित’ आहे की नाही, हे तपासूनच घ्यावी.”

या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली असून, हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्या एका संताच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता राज्य सरकार यावर काय कारवाई करते याकडे संपूर्ण राज्याचे आणि हिंदू समाजाचे लक्ष लागले आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!