भारतीय विवाह संस्थेला बळकटी देणाऱ्या कृति आराखड्यासंदर्भात नाशिक येथे सकल भारतीय सोनार समाज संघटनतर्फे सहविचार बैठक !

१८ जुलै रोजी नाशिकेत सोनार समाजाची महत्त्वपूर्ण बैठक

नाशिकरोड (प्रतिनिधी) – भारतीय विवाह संस्थेला बळकटी देण्यासाठी आणि विवाहविषयक समस्या व घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी सकल भारतीय सोनार समाज संघटनतर्फे एक महत्त्वपूर्ण सहविचार बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक शुक्रवार, दिनांक १८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता श्री संत नरहरी महाराज मंदिर, तोरणानगर, शांती चौक, पवननगर जवळ, सिडको, नाशिक येथे होणार आहे.

सर्व शाखीय सोनार समाजाचे एकत्रीकरण आणि समाज प्रबोधनासाठी सक्रिय असलेल्या *सकल भारतीय सोनार समाज संघटन* या व्यासपीठाने या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत विवाहविषयक समस्या, घटस्फोटाचे वाढते प्रमाण आणि त्यावरील उपाययोजना यावर सविस्तर चर्चा होणार आहे. यासाठी एक कृति आराखडा तयार करण्यात येणार असून त्याच्या अंमलबजावणीबाबत विचारमंथन केले जाणार आहे.

या बैठकीला सर्व शाखीय सोनार समाजातील ज्येष्ठ, मध्यमवयीन आणि नवविवाहित दाम्पत्ये, समाज बांधव आणि भगिनी, त्यांचे पालक, विवाह मेळावे आणि सामुदायिक विवाहसोहळा आयोजक संस्थांचे पदाधिकारी यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सिडको सुवर्णकार समाज, अहिर सुवर्णकार समाज, लाड सोनार समाज, देशस्थ दैवज्ञ सोनार समाज, मैढ क्षत्रिय स्वर्णकार समाज, युनिव्हर्सल विश्वकर्मा वंशज फाउंडेशन इंटरनॅशनल, दैवज्ञ सोनार महासंघ महाराष्ट्र राज्य, अखिल देशस्थ दैवज्ञ सोनार संस्था महाराष्ट्र प्रांतिक मंडळ, अखिल वैश्य सोनार महासंघ, भारतीय सुवर्णकार समाज महाराष्ट्र प्रदेश, नाशिक जिल्हा माळवी सोनार समाज, श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था, हस्तशिल्प सुवर्णकार कारागीर वेल्फेअर असोसिएशन, सोनार, सोनी, स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्र, सकल भारतीय सोनार समाज संघटन, वंशावळी डॉट कॉम, सेतुबंधन मधील विविध सोनार समाज संस्था आणि संघटना यांच्या वतीने श्री रमेशशेट वडनेरे, सुनीलशेट महालकर, प्रकाशशेट वडनेरे, संदीपशेट वर्मा, शांताराम गोपाळशेट दुसाने, नंदकिशोर फाकटकर, सुरेंद्र खोलमकर, संदीप भगीरथशेट सराफ, भास्करराव मैंद, बाळासाहेब सोनगीरकर, राजेंद्र शेरेकर, दिलीपशेट शहाणे घोटीकर, भैयाभाऊ भामरे, विकास शांताराम विसपुते, मिलिंदकुमार सोनार आदींनी हे आवाहन केले आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!