जीएसटी अधिकारी कोट्यवधींच्या फसवणुकीच्या जाळ्यात! शेतकऱ्यांचे आर्थिक स्वप्न उद्ध्वस्त

९७.५ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी जीएसटी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१५:-: सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या फसवणुकीचा मुख्य सूत्रधार नाशिकच्या जीएसटी विभागातील अधिकारी असल्याचे उघड झाले आहे. सचिन बबनराव चिखले असे या अधिकाऱ्याचे नाव असून, त्याने तब्बल ९७,५०,००० रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अंबड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

फसवणुकीचा बळी ठरलेले तुळशीराम भिकाजी पवार (वय ५३, रा. जाधव नगर, सटाणा) यांनी आपली व्यथा कथन करताना सांगितले की, आरोपी सचिन चिखले याने त्यांच्या मुलाला सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. बनावट नियुक्तीपत्र, प्रतीक्षा यादी दाखवून त्याने पवार कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला. वेळोवेळी १९,५०,००० रुपये घेतल्यानंतरही मुलाची नोकरी झाली नाही तेव्हा पवार यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. चौकशी केल्यानंतर असे समोर आले की, चिखले याने अशाच प्रकारे अनेक शेतकऱ्यांना फसवले आहे. एकूण फसवणुकीची रक्कम तब्बल ९७,५०,००० रुपये आहे.

या धक्कादायक प्रकारामुळे शेतकरी कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चिखले याच्यावर यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. सपोनि प्रताप गिरी हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोनि खैरनार आणि सपोनि गिरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

गुन्हेगाराचा शोध:

  • आरोपीने वापरलेले बँक खाते तपासले जात आहे.
  •  त्याचे मोबाइल लोकेशन ट्रॅक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
  •  त्याच्या नातेवाईक आणि मित्रांची चौकशी केली जात आहे.

पोलीस लवकरात लवकर आरोपीला पकडून फसवणूक झालेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दरम्यान, या घटनेमुळे नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

 

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!