गजू घोडके यांचा मनपा प्रवेशद्वारासमोर उपोषणाचा इशारा! द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

टपरीधारक विरुद्ध वाहतूक कोंडी: नाशिक मनपा समोर नवे आव्हान

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१४:-:द्वारका चौकातील वाहतूक कोंडीच्या समस्येने नाशिककरांचे नाकाला आले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गजू घोडके यांनी आक्रमक पवित्रा घेत मनपा प्रशासनाला पंधरा दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे. द्वारका येथील मनपा मलेरिया कार्यालयाच्या जागेतील टपरीधारकांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, पंधरा दिवसांत यावर तोडगा निघाला नाही तर मनपा कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

द्वारका चौक हा शहराचा प्रमुख प्रवेशद्वार असून, या चौकातील टपऱ्यांमुळे सतत वाहतूक कोंडी होत असून, नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. शहरात प्रवेश करतानाच नागरिकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. प्रशासनाने या समस्येवर तोडगा काढण्याचे प्रयत्न केले असले तरी, अद्याप कोणताही ठोस उपाययोजना झालेली नाही.

घोडके यांच्या मते, टपऱ्या हटवणे हा या समस्येवरचा योग्य तोडगा आहे. मात्र, त्यामुळे टपरीधारकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ नये याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या या प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लागण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!