आयुक्तांच्या ‘गुड बुक्स’मध्ये म्हसरूळ पोलीस; उत्कृष्ट कामगिरीने मिळवली मानाची शाबासकी!

म्हसरूळ गुन्हे शोध पथकाची धाडसी कारवाई; घरफोडी, चोरी, स्नॅचिंगचे ६ गुन्हे उघड, ६.५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि.३०:-(आमच्या प्रतिनिधीकडून):नाशिक शहरात दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत! पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या ‘ॲक्शन मोड’ निर्देशानंतर, म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका धाडसी आणि गुप्त ‘ऑपरेशन’मध्ये दोन खतरनाक चोरट्यांना जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे घरफोडी, चोरी आणि स्नॅचिंगचे तब्बल ६ गुन्हे उघडकीस आले असून, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या नेत्रदीपक कामगिरीबद्दल स्वतः पोलीस आयुक्तांनी संपूर्ण पथकाचा गौरव करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात मालमत्तेच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी सर्व पोलीस ठाण्यांना गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळण्याचे सक्त आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंकुश चिंतामन यांनी आपल्या गुन्हे शोध पथकाची विशेष बैठक घेऊन कारवाईची रणनीती आखली. खबऱ्यांचे ‘सिक्रेट नेटवर्क’ आणि तांत्रिक विश्लेषणाचे चक्रव्यूह भेदत पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा निश्चित केली.

पोलिसांनी अत्यंत हुशारीने आणि मानवी बुद्धिमत्तेची जोड देत सराईत गुन्हेगार रितेश भाऊसाहेब चव्हाण आणि साहिल केशव निकम यांच्यावर पाळत ठेवली. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून या दोघांनाही ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या चोरट्यांपुढे पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून म्हसरूळ आणि पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ६ गुन्हे उघडकीस आले असून, नागरिकांकडून चोरलेला तब्बल ६,५५,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

आयुक्तांकडून ‘शाब्बासकी’ अन् गौरव !

या धाडसी आणि कौतुकास्पद कामगिरीची दखल थेट पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी घेतली. पोलीस आयुक्त कार्यालयात एका विशेष कार्यक्रमात त्यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंकुश चिंतामन आणि त्यांच्या संपूर्ण ‘शूरवीर’ पथकाचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला. “या कामगिरीमुळे इतर पोलिसांनाही प्रेरणा मिळेल आणि नाशिक शहर गुन्हेगारीमुक्त करण्याच्या आमच्या संकल्पाला बळ मिळेल,” अशा शब्दांत आयुक्तांनी पथकाचे कौतुक केले. या सत्कारामुळे संपूर्ण पथकाचे मनोधैर्य दुणावले असून, ‘शहरवासीयांच्या सुरक्षेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हे आहेत ‘नाशिकचे शिलेदार’! (गौरविण्यात आलेले पथक)

मार्गदर्शक अधिकारी: वपोनि. अंकुश चिंतामन

अधिकारी: सपोनि. उमेश बोरसे, पोउनि. दिपक पटारे

  • शौर्यवान अंमलदार:

  •     सपोउनि. बाळासाहेब मुर्तडक
  •      पोहवा. सतिष वसावे
  •      पोहवा. देवराम चव्हाण
  •      पोहवा. राकेश शिंदे
  •      पोहवा. प्रशांत वालझाडे
  •      पोअं. मनोज आहेर
  •      पोअं. पंकज चव्हाण
  •      पोअं. पंकज महाले
  •      पोअं. ज्ञानेश्वर कातकाडे
  •      पोअं. गुणवंत गायकवाड
  •      पोअं. स्वप्नील गांगुर्डे
  •      पोअं. भाऊराव गवळी
  •      पोअं. नितिन पारधे
  •      पोअं. योगेश सस्कर

 

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!