चोरट्याला पकडले! गुन्हेशाखा युनिट क-२ ची धडाकेबाज कामगिरी! नाशिककरांची झोप उडवणारा मोटारसायकल चोर जेरबंद!

नाशिकमध्ये मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा!

लाल 🚨 दिवा-नाशिक ,दि.१६:–नाशिक शहरात दहशत माजवणाऱ्या मोटारसायकल चोरांना आता पोलिसांचा धाक बसला आहे. गुन्हेशाखा युनिट क-२ ने एका धडाकेबाज कारवाईत एका कुख्यात मोटारसायकल चोराला जेरबंद केले आहे. त्याच्या ताब्यातून चोरीची सुझुकी अॅक्सेस मोपेड जप्त करण्यात आली आहे. नाशिककरांना चोरीच्या घटनांपासून दिलासा मिळाला असून, पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या निर्देशानुसार गुन्हेशाखा युनिट २ सक्रिय होते. पोहवा संजय सानप आणि वाल्मिक चव्हाण यांना गुप्त बातमीदारामार्फत एक धक्कादायक माहिती मिळाली. एक चोर चोरीची सुझुकी अॅक्सेस मोपेड विकण्यासाठी मॅकडोनाल्ड हॉटेलच्या मागील गल्लीत येणार होता. ही माहिती मिळताच सपोनि हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने सापळा रचला. आणि नेमके त्याच ठिकाणी कामरान जुबेर खाटीक (१९, रा. कथडा मजिद, नाशिक) याला रंगेहाथ पकडण्यात आले.

पोलिसांच्या कसून चौकशीनंतर त्याने चेतनानगर, राणेनगर येथील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमधून मोपेड चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्यासह सपोनि हेमंत तोडकर, सपोनि डॉ. समाधान हिरे, पोउनि मुक्तारखान पठाण, पोहवा संजय सानप, प्रकाश बोडके, अतुल पाटील, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, पोअं प्रविण वानखेडे, संजय पोटींदे, तेजस मते, चापोअं जितेंद्र वजीरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!