चोरीच्या मोटारसायकलसह चोरटा जेरबंद: नाशिक पोलिसांची कामगिरी

४५,००० रुपयांची चोरीची मोटारसायकल हस्तगत: आरोपी अटकेत

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.९:- नाशिक शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखा युनिट १ ने चोरीच्या मोटारसायकलसह एका चोरट्याला अटक केली आहे. आरोपीने चोरीच्या मोटारसायकलवर बनावट नंबर प्लेट लावून ती वापरत असल्याचे तपासात उघड झाले आहे. ही कामगिरी शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

दिनांक ८ जुलै २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट १ ला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम चोरीच्या हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकलवरून त्रंबक नाका सिग्नलकडून जलतरण तलाव सिग्नलकडे जाणार आहे. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार सपोनि हिरामण भोये, पोउनि किरण शिरसाठ आणि पोहवा प्रविण वाघमारे, संदीप भांड, प्रशांत मरकड, विशाल देवरे, नाझीमखान पठाण, मिलिंदसिंग परदेशी, पोअं मुक्तार शेख, अमोल कोष्टी यांच्या पथकाने राजदूत हॉटेलजवळ सापळा रचला.

पथकाने संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव अजय गणेश पवार (वय २७, रा. फ्लॅट नं १७, तुलसी धारा अपार्टमेंट, आनंदनगर, नाशिकरोड) असे सांगितले. त्याच्या ताब्यातील मोटारसायकलवर MH 15 DW 7761 ही बनावट नंबर प्लेट होती. पवारकडे मोटारसायकलच्या मालकी हक्काची कागदपत्रेही सापडली नाहीत.

तपासात ही मोटारसायकल आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीला गेल्याचे उघड झाले. आडगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गु.र.नं. ६६/२०२४ अन्वये भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. पवारला अटक करून जप्त केलेली ४५,००० रुपये किमतीची मोटारसायकल आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट १ च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!