पेट्रोलपंपावरील दगडफेकीचा आरोपी जेरबंद: नाशिक पोलिसांची त्वरित कारवाई

नागरिकांना दिलासा! पेट्रोलपंप दगडफेकीचा आरोपी अखेर जेरबंद!

नाशिक: लाल 🚨 दिवा,दि.९:-नाशिक शहर पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध करत पेट्रोलपंपावर दहशत माजवणाऱ्या आरोपीला जेरबंद केले आहे. बिटको येथील पेट्रोमाईन पेट्रोलपंपावर दगडफेक करून कर्मचाऱ्यांना धमकावणाऱ्या सुमित राकेश खरे (वय २१) यास गुन्हेशाखा युनिट २ ने बेड्या ठोकल्या आहेत.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, खरे याने इतर साथीदारांसह पेट्रोलपंपावर बेकायदेशीर जमाव केला होता. कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून, हातापायाने मारहाण करण्यात आली. जीवे मारण्याची आणि पेट्रोलपंप जाळण्याची धमकी देण्यात आली. तसेच, कर्मचाऱ्यांवर चॉपरने हल्ला करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. उपनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ ने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. ८ जुलै २०२५ रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, आरोपी सुमित खरे हा शिंदे टोल नाका परिसरात फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.  

आरोपीने गुन्हा कबूल केल्याने त्याला उपनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. गुन्हेशाखा युनिट २ च्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशस्वी कारवाईत सपोनि हेमंत तोडकर, सपोनि डॉ. समाधान हिरे, श्रेणी पोउनि यशवंत बॅडकोळी, सपोउपनिरी शंकर काळे आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!