ललित रुंग्टा ग्रुप’चा अघोरी खेळ! अपघाताची जबाबदारी झटकण्यासाठी रातोरात बनवले ‘बॅकडेटेड’ करारपत्र; पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने पकडली बिल्डरची ‘ही’ मोठी चोरी, आता नोटरीसह मालकही गोत्यात?

रुंग्टा’चे ‘पाप’ झाकण्याचा डाव मुंबई नाका पोलिसांनी उधळला! मजुराच्या बळीनंतर गरीब ठेकेदाराला अडकवण्याचे ‘बोगस’ कटकारस्थान उघड!

■ स्वतःची कातडी वाचवण्यासाठी बिल्डरचा ‘बोगस डॉक्युमेंट’चा खेळ; नोटरीही अडचणीत

■ पोलिसांची चाणाक्ष नजर: अपघाताचा तपास हत्येच्या आणि फसवणुकीच्या दिशेने !

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२७: आरडी सर्कल (टेक वन) येथील बांधकाम साइटवर मजुराचा जीव गेल्यानंतर स्वतःला कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी ‘ललित रूंघटा ग्रुप’ने रचलेला अत्यंत खालच्या पातळीचा डाव मुंबई नाका पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. “आम्ही नाही, तर तो गरीब ठेकेदार जबाबदार!” असे भासवण्यासाठी बिल्डरने चक्क ‘बॅकडेटेड’ (मागील तारखेचे) बनावट करारपत्र बनवून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, तपासी अंमलदार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी हा बनाव वेळीच ओळखून तपासाची दिशा आता थेट बिल्डरच्या मुसक्या आवळण्याकडे वळवली आहे.

काय आहे ‘फेक डॉक्युमेंट’चे प्रकरण?

दि. १७/०२/२०२६ रोजी सायंकाळी रूंघटा ग्रुपच्या साईटवर मातीचा ढिगारा कोसळून नागेंद्र यादव (२४) या मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत थेट बिल्डरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, हे ओळखून बिल्डर लॉबीने घटनेनंतर तातडीने सूत्रे हलवली.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची जबाबदारी बिल्डरवर येऊ नये म्हणून एका गरीब पेटी-कॉन्ट्रॅक्टरला (लेबर कॉन्ट्रॅक्टर) बळीचा बकरा बनवण्याचे ठरले. यासाठी तातडीने एका नोटरीला  “घटनेच्या आधीच्या तारखेचे सेफ्टी ॲग्रीमेंट तयार करण्याचा घाट घालण्यात आला. ज्यामध्ये “सुरक्षेची सर्व जबाबदारी ठेकेदाराची असेल,” असा मजकूर घुसडण्यात आला होता.

पोलिसांची ‘सिंघम’ कामगिरी!

मात्र, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील आणि तपासी अंमलदार पोहवा के.एन. गायकवाड यांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत बारकाईने सुरू केला. बिल्डरने सादर केलेल्या कागदपत्रांवर पोलिसांना संशय आला.

पोलिसांचा मास्टरस्ट्रोक: पोलिसांनी कागदपत्रांची शाई,  नोटरीची वेळ (Timing) याची पडताळणी करताच बिल्डरचा खोटेपणा उघड झाला. अपघातानंतर कागदपत्रे बनवल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे.

नोटरीही अडकणार जाळ्यात?

पैशांच्या आमिषापोटी बेकायदेशीरपणे मागील तारखेचे (Backdated) नोटरी करणाऱ्या संबंधित वकिलावरही पोलीस कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. खोटा पुरावा तयार करणे (Fabrication of Evidence) या गुन्ह्याखाली नोटरीसह बिल्डरवर आता आणखी कडक कलमे लावली जाण्याची शक्यता आहे.

“बिल्डर कितीही मोठा असो, गरिबाच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि कायद्याची दिशाभूल करणाऱ्या कुणालाही सोडले जाणार नाही. बोगस कागदपत्रे तयार करणे हा गंभीर गुन्हा आहे. आम्ही सखोल तपास करत असून लवकरच मोठ्या कारवाईची अपेक्षा आहे,” असा विश्वास पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणात मुंबई नाका पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे सर्वस्तरातून कौतुक होत असून, श्रीमंत बिल्डरच्या दबावाला बळी न पडता पोलिसांनी ‘खाकी’चा दरारा दाखवून दिल्याचे बोलले जात आहे.

बातमीचे काही ठळक मुद्दे

१. बिल्डरचा ‘खोटा’ डाव पोलिसांनी ओळखला! रूंघटा समूहाकडून गरीब ठेकेदाराला अडकवण्याचे कारस्थान निष्फळ.

२. ‘बैकडेटेड’ नोटरी करून स्वतःची सुटका करण्याचा रूंघटाचा प्रयत्न फसला; मुंबई नाका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!

३. मजुराचा बळी आणि कागदाचा खेळ! बिल्डरसह नोटरीही पोलिसांच्या रडारवर; तपासाला वेगळे वळण.

४. खाकीने दाखवला हिसका! बनावट कागदपत्रे फेकून मारत पोलिसांनी बिल्डरला सुनावले, “कायदा विकत घेता येत नाही!”

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!