नाशिकमध्ये नात्याला काळीमा: ‘आईच्या वृद्धापकाळाला कंटाळलो’, मुलानेच गळा दाबून घेतला ८५ वर्षीय आईचा जीव!

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.८:-: नाशिकच्या शिवाजीनगर, जेलरोड परिसरात मंगळवारी रात्री एका मन सुन्न करणाऱ्या घटनेने खळबळ उडाली. ‘आईच्या म्हातारपणाला आणि आजारपणाला मी कंटाळलो होतो,’ असे म्हणत एका ५८ वर्षीय मुलाने आपल्या ८५ वर्षीय जन्मदात्या आईचा गळा दाबून निर्घृण खून केला. यशोदा मुरलीधर पाटील (वय ८५) असे मृत वृद्धेचे नाव असून, अरविंद मुरलीधर पाटील (वय ५८) असे आरोपी मुलाचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे अमानुष कृत्य केल्यानंतर आरोपी अरविंद स्वतः नाशिक रोड पोलीस ठाण्यात हजर झाला आणि आपल्या गुन्ह्याची कबुली दिली

आज दिनांक ०७/१०/२०२५

रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास इसम नामे अरविंद मुरलीधर पाटील (वय ५८, रा. शिवाजीनगर, जेलरोड, नाशिक) हे नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे आले. त्यांनी पोलिसांना सांगितले की, “मी आईच्या वृद्धापणाला कंटाळून तिचा गळा दाबून खून केला आहे. मला अटक करा.”

त्यांच्या या कबुलीने पोलीसही चक्रावून गेले. माहितीची खात्री करण्यासाठी तात्काळ एक पोलीस पथक शिवाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना यशोदा पाटील यांचा मृतदेह आढळून आला आणि अरविंद सांगत असलेली बाब खरी असल्याचे निष्पन्न झाले.

हत्येमागील कारण आणि तपास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरविंद याने आईच्या वृद्धापकाळामुळे आणि सततच्या आजारपणामुळे त्रस्त होऊन हे टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली दिली आहे. मात्र, यासोबतच आरोपी मनोरुग्ण (मानसिकदृष्ट्या आजारी) असल्याचीही माहिती समोर येत आहे. पोलीस या दोन्ही बाजूने तपास करत आहेत.

सध्या नाशिक रोड पोलिसांनी आरोपी अरविंद पाटील याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!