सिंग गन हाऊसमधून ५० हजार रुपये किमतीची एअरगन लंपास; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

नाशिक-पुणे महामार्गावरील गन हाऊसमधून महागड्या एअरगनची चोरी.

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. २३: नाशिक-पुणे महामार्गावरील ‘सिंग गन हाऊस’ या दुकानातून ग्राहक म्हणून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने ५० हजार रुपये किमतीची एअरगन हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना १४ सप्टेंबर रोजी घडली असून, याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुमितसिंग वधवा (वय २३, रा. श्रीरामपूर) हे ‘सिंग गन हाऊस’ येथे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ४:४५ च्या सुमारास एक अनोळखी इसम दुकानात ग्राहक म्हणून आला. त्याने पिस्तूल गन पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

फिर्यादी वधवा त्याला एअर पिस्तूल गन दाखवत असताना, त्या व्यक्तीने ५०,००० रुपये किमतीची ‘डॅन वेसन CO2 रिव्हॉल्व्हर एअर गन’ पाहण्यासाठी मागितली. वधवा यांच्या हातातील एअरगन त्या व्यक्तीने बळजबरीने हिसकावली आणि दुकानाबाहेर पळ काढला. बाहेर थांबलेल्या आपल्या साथीदारासोबत तो मोटारसायकलवरून पसार झाला.

या घटनेनंतर २२ सप्टेंबर रोजी उपनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४) आणि ३ (५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांनी घटनास्थळाला भेट दिली असून, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!