नाशिकमध्ये महसूल क्रांती! ‘सेवा पंधरवडा’ ठरणार नागरिकांसाठी वरदान!

थकबाकी मुक्तीपासून जिवंत सातबाऱ्यापर्यंत सर्व कामे होणार एकाच छताखाली; तहसीलदार पंकज पवार यांचा धडाकेबाज उपक्रम!

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि.१३:-प्रतिनिधी:महसूल विभागातील कामांसाठी होणारी हेलपाटे आणि दिरंगाई आता इतिहासजमा होणार! सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी नाशिक तहसील प्रशासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत’ कंबर कसली असून, येत्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ राबवून प्रलंबित कामांचा थेट निपटारा करण्याचा धडाकेबाज निर्णय घेतला आहे.

महसूल विभाग हा नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांशी जोडलेला असल्याने प्रशासनात अधिक लोकाभिमुखता, गतिमानता आणि पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नाशिकचे कार्यक्षम तहसीलदार, पंकज पवार यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली या अभियानाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या पंधरवड्यात प्रशासकीय अधिकारी थेट जनतेच्या दारात पोहोचून त्यांच्या समस्यांवर जागीच तोडगा काढणार आहेत.

काय आहे ‘सेवा पंधरवडा’ योजनेत? नागरिकांना मिळणार थेट लाभ!

प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी विविध योजनांचा खजिनाच खुला केला आहे. यात खालील प्रमुख कामांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे:

थकबाकी मुक्ती मोहीम: कर्जाच्या ओझ्यातून शेतकऱ्यांची कायमची सुटका.

जिवंत सातबारा व रेशन कार्ड: कागदपत्रांमधील चुकांची दुरुस्ती तात्काळ होणार. आता चुकीच्या नोंदींना कायमचा रामराम!

शेत सुलभ योजना व पाणंद रस्ते: शेतावर जाण्याचा मार्ग होणार मोकळा. पाणंद रस्त्यांवरील वाद कायमचे मिटणार.

अतिक्रमण हटाव मोहीम: दफनभूमी, स्मशानभूमीवरील अतिक्रमणे हटवून जागेला मिळणार न्याय.

शालेय दाखले शिबिर: विद्यार्थ्यांना मिळणार एकाच ठिकाणी सर्व आवश्यक दाखले. शिक्षणातील अडथळे दूर!

वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ मध्ये रूपांतर:जमिनीच्या व्यवहारातील अडथळे दूर होऊन मालकी हक्क होणार अधिक मजबूत.

सामाजिक सहाय्य योजना: गरजूंपर्यंत शासकीय योजनांचा लाभ थेट पोहोचणार.

प्रशासनाकडून थेट आवाहन!

“हा पंधरवडा केवळ एक शासकीय उपक्रम नसून, नागरिकांच्या समस्या मुळापासून सोडवण्याचा आमचा संकल्प आहे. गिरणारे मंडळातील सर्व शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन मंडळ अधिकारी प्रिती अग्रवाल यांनी केले आहे. त्यांच्यासह मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी या अभियानाच्या यशस्वीतेसाठी झटत आहेत.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!