नाशिक पोलिसांची गरुड झेप! एम.डी. रॅकेटच्या मुसक्या आवळल्या; वाशीपर्यंतचे कनेक्शन उघड, लाखोंचा ‘माल’ जप्त!

नाशिक: ३४ ग्रॅम एम.डी. (मॅफेड्रॉन) जप्त, एकास अटक; तिघे फरार.

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. १८:  नाशिक शहराला विळखा घालणाऱ्या अंमली पदार्थांच्या रॅकेटविरोधात पोलिसांनी आज एक मोठी कारवाई करत फर्नांडीस वाडी परिसरातून एका सराईत गुन्हेगारासह तिघांना गजाआड केले आहे. या थरारक कारवाईत पोलिसांनी तब्बल १ लाख ७० हजार रुपये किमतीचा ३४ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरातील ड्रग्ज माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या धडाकेबाज प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना त्यांच्या गोपनीय खबऱ्यामार्फत जयभवानी रोड, फर्नांडीस वाडी येथील मराठा निवासमध्ये राहणारा विजय सोनवणे (वय अंदाजे ४०) हा त्याच्या घरात एम.डी. ड्रग्जचा मोठा साठा बाळगून असल्याची पक्की खबर मिळाली होती. माहितीची खात्री होताच, वपोनि कोल्हे यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या पथकासह सापळा रचला.

शासकीय पंच आणि विशेष श्वान पथकाला सोबत घेऊन पोलिसांनी विजय सोनवणे याच्या घरावर धाड टाकली. पोलिसांना पाहताच सोनवणे याची भंबेरी उडाली, मात्र पथकाने त्याला जागेवरच जेरबंद केले. घराची झडती घेतली असता, तब्बल ३४ ग्रॅम एम.डी. हा जीवघेणा अंमली पदार्थ सापडला, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत १,७०,००० रुपये आहे. यासोबतच ५,१०० रुपयांचा इतर मुद्देमाल असा एकूण १,७५,१०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

<span;>आरोपी विजय सुखदेव सोनवणे (वय ३९) याला अटक करून उपनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गु.र. नं ३५२/२०२५ अन्वये एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८ (क), २२ (ब), २९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रॅकेटचे धागेदोरे उघड, आणखी दोघे ताब्यात

विजय सोनवणे याच्या चौकशीत या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या त्याच्या दोन साथीदारांची नावे समोर आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रोहीत नेहे (वय २८, रा. विहीतगाव) आणि कैफ पठाण (रा. सिन्नर फाटा) या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. यातील आरोपी रोहीत नेहे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीच नाशिकरोड पोलीस ठाण्यात अंमली पदार्थांसंदर्भात गुन्हा दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तिघांनाही पुढील तपासासाठी उपनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

कौतुकास्पद कामगिरी

ही धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि सुशिला कोल्हे, सपोनि विशाल पाटील, सपोनि सचिन चौधरी, सपोउनि रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, संजय ताजणे, पोहवा बळवंत कोल्हे, भारत डंबाळे, पो.अं. गणेश वडजे, बाळासाहेब नांदे, योगेश सानप, चंद्रकांत बागडे, फुलपगारे, मपोअं. अर्चना भड यांच्या पथकाने केली. तसेच बी.डी.डी.एस.च्या श्वान पथकातील ‘मॅक्स’ या श्वानाने व त्याचे प्रशिक्षक पोहवा कोंडे, पोना ससाने आणि पो.अं. कोल्हे यांनी मोलाची कामगिरी बजावली.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!