उत्तर प्रदेशातील गुन्ह्याचे नाशिक कनेक्शन, गुंडा विरोधी पथकाची धडक कारवाई!
लाल 🚨 दिवा नाशिक,दि.३ : नाशिकच्या बांधकाम विश्वातील मोठं नाव असलेले प्रसिद्ध व्यावसायिक नरेश कार्डा यांना नाशिक पोलिसांच्या गुंड विरोधी पथकाने नुकतीच अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील एका गंभीर गुन्ह्याप्रकरणी त्यांच्यावर हे अटक वॉरंट बजावण्यात आले असून, या कारवाईमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, गुंडा विरोधी पथकाने अत्यंत गुप्तता पाळत आणि मोठ्या शिताफीने ही कारवाई पार पाडली. कार्डा यांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. उत्तर प्रदेशातील गुन्ह्याशी हे प्रकरण संबंधित असल्याचे समजते..
कार्डा यांना लवकरच न्यायालयात हजर करून पुढील कारवाईसाठी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले जाण्याची शक्यता आहे. या हाय-प्रोफाइल अटकेने नाशिकमधील व्यावसायिक आणि राजकीय वर्तुळात भूकंपाचे धक्के बसले आहेत.







