नाशिक हादरले! उच्चभ्रू वस्तीत हॉटेल व्यावसायिकाला लाखोंची खंडणी; दाम्पत्याचा ‘मोरया’ बंगल्यातून दहशतीचा खेळ!

सराईत महिलेचा पतीसह प्रताप; हॉटेल चालवायचे असेल तर ७ लाख द्या, नाहीतर…

लाल 🚨 दिवा नाशिक, दि. ३० (प्रतिनिधी):

शहरातील शांत आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पाथर्डी-देवळाली रोड परिसरात एका नामांकित हॉटेल व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देत तब्बल सात लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या एका दाम्पत्याचा थरार उघडकीस आला आहे. यातील आरोपी महिला  तिच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हा दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने नाशिकच्या व्यावसायिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

  • काय आहे नेमके प्रकरण?

गोविंद नगर येथील रहिवासी आणि ‘रॉयल लिस्टो फॅमिली रेस्टॉरंट व बार’चे मालक, श्री. आशुतोष कृष्णा गडलिंग (वय ३८), यांनी या दहशतीविरोधात आवाज उठवला आहे. त्यांच्या हॉटेलच्या समोरच असलेल्या ‘मोरया’ बंगल्यात राहणारे श्रृती यतिन नाईक आणि यतिन नाईक या दाम्पत्याने गेल्या काही दिवसांपासून गडलिंग यांना टार्गेट केले होते. “तुमच्या हॉटेलमुळे आम्हाला त्रास होतोय,” हा केवळ एक बहाणा होता. या बहाण्याआडून त्यांनी आपला खरा डाव साधला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ७ ते १४ जुलै दरम्यान, या दाम्पत्याने संगनमत करून अक्षरशः धुमाकूळ घातला. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना आणि काम करणाऱ्या वेटर्सना अडवून दहशत निर्माण केली. “हॉटेल शांततेत चालवायचे असेल, तर आम्हाला गपचूप सात लाख रुपये द्या, नाहीतर तुझे हॉटेल चालू देणार नाही,” अशी थेट धमकी देत त्यांनी व्यावसायिकाच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला.

आरोपी महिला 

या प्रकरणाला सर्वात धक्कादायक वळण मिळाले ते आरोपी श्रृती नाईक हिच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे. तिच्यावर यापूर्वी २०२२ साली विनयभंग, मारहाण आणि शिवीगाळ (भादवी ३५४, ३२३, ५०४) यांसारखा गंभीर गुन्हा दाखल आहे. गुन्हेगारीची पार्श्वभूमी असतानाही ती पुन्हा अशा कृत्यात सक्रिय झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

पोलीस ॲक्शन मोडमध्ये, दाम्पत्य फरार!

अखेर या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून श्री. गडलिंग यांनी २९ जुलै रोजी रात्री इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या आदेशाने पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी श्रृती आणि यतिन नाईक यांच्या विरोधात खंडणी आणि धमकी दिल्याप्रकरणी (भा.न्या.सं. कलम ३०८(३), १२६(२) सह) गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल  असून, पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक त्यांचा कसून चौकशी करीत  आहे. या हायप्रोफाईल खंडणीकांडाने शहरात एकच खळबळ उडवून दिली आहे….

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!