लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२६:-शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि शांत मानल्या जाणाऱ्या उंटवाडी परिसरातील ‘सेंट्रल पार्क’ या उच्चभ्रू निवासी प्रकल्पात सुरू असलेला एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. गरिबांच्या हक्काच्या घरांवर डल्ला मारून तिथे थेट ‘मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी’ निवासी वस्तीगृह (होस्टेल) सुरू करण्याचा घाट घातला जात होता. मात्र, भारतीय जनता पक्षाचे नेते सुधाकर बडगुजर आणि दीपक बडगुजर यांनी वेळेवर धाव घेत हा कथित “लँड जिहाद”चा डाव अक्षरशः उधळून लावला आहे. या भयंकर प्रकारामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली असून बिल्डर लॉबी आणि प्रशासनाच्या संगनमतावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्राप्त झालेल्या धक्कादायक माहितीनुसार, भाविक ग्रुपचे बांधकाम व्यावसायिक पिंकेश शहा यांनी उंटवाडी रोडवरील ‘सेंट्रल पार्क’ या भव्य प्रकल्पातील अनेक फ्लॅट्स गुपचूपपणे नागपूरच्या एका होस्टेल व्यवस्थापन कंपनीला करारावर दिले होते. विशेष म्हणजे, हे सर्व फ्लॅट्स केवळ मुस्लिम विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहासाठी वापरले जाणार होते. सर्वसामान्य हिंदू रहिवाशांच्या मध्यवस्तीत असा प्रकार सुरू झाल्याने परिसरातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात येण्याची दाट शक्यता होती. ही गुप्त हालचाल सुरू असतानाच सुदैवाने स्थानिक रहिवाशांना याचा सुगावा लागला.
भाजपचा एल्गार आणि नागरिकांचा उद्रेक

या संतापजनक प्रकाराची माहिती मिळताच भाजप नेते सुधाकर बडगुजर आणि दीपक बडगुजर यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह आणि स्थानिक रहिवाशांना सोबत घेत घटनास्थळी धडक दिली. “निवासी प्रकल्पात व्यावसायिक होस्टेल कसे काय?” आणि “गरिबांच्या घरात वस्तीगृह का?” असे थेट सवाल करत आंदोलकांनी सेंट्रल पार्क परिसर दणाणून सोडला. नागरिकांच्या घोषणाबाजीने आणि आक्रमक पवित्र्यामुळे बिल्डर आणि संबंधित होस्टेल चालकांचे चांगलेच धाबे दणाणले.
*अधिकाऱ्यांचीही उडाली झोप!*
आंदोलनाची तीव्रता इतकी होती की थेट नगररचना अधिकारी सचिन जाधव यांना व्हिडिओ कॉलवरून संपर्क साधण्यात आला. संतप्त रहिवाशांनी जाधव यांना धारेवर धरत विचारणा केली की, केवळ निवासी उद्देशासाठी बांधलेल्या इमारतीत कमर्शियल मुस्लिम होस्टेल कसे चालवले जाऊ शकते? नागरिकांचा रुद्रावतार पाहून अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेत कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
गरिबांच्या घरांवर डल्ला मारण्याचा संतापजनक प्रकार
या प्रकरणातील सर्वात मोठा आणि काळा सत्य म्हणजे, सेंट्रल पार्क प्रकल्पात एकूण ६७२ निवासी सदनिका आहेत. नियमानुसार त्यातील २० टक्के म्हणजेच तब्बल १४४ फ्लॅट हे ‘आर्थिक दुर्बल घटकांसाठी’ (EWS) राखीव ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे. या घरांवर खऱ्या अर्थाने गरीब आणि गरजू नागरिकांचा हक्क आहे. मात्र, पैशांच्या हव्यासापोटी हे गरिबांचे फ्लॅट व्यावसायिक तत्त्वावर होस्टेलसाठी देण्याचा भयंकर प्रताप बिल्डरकडून केला जात असल्याचा गंभीर आरोप बडगुजर यांनी केला आहे.
“गरज पडल्यास नाशिक बंद करू!” – सुधाकर बडगुजर यांचा इशारा
यावेळी आक्रमक भूमिका घेताना सुधाकर बडगुजर यांनी कडक शब्दांत सुनावले, “निवासी आणि शांतताप्रिय भागात असे वस्तीगृह सुरू करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा हा अत्यंत निंदनीय प्रयत्न आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आज मोठा अनर्थ टळला. बिल्डरने आपली चूक मान्य करत हा बेकायदेशीर करार तत्काळ रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या १४४ फ्लॅट्सचे वाटप जोपर्यंत योग्य आणि पात्र गरिबांना होत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. गरज पडल्यास याविरोधात आणखी उग्र आंदोलन छेडले जाईल!”
रहिवाशांनी मानले आभार
बडगुजर यांच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे सेंट्रल पार्क परिसरातील रहिवाशांनी मोठा सुटकेचा निश्वास टाकला आहे. नागरिकांनी भाजपच्या या भूमिकेचे जोरदार स्वागत केले असून, भविष्यात अशा छुप्या लँड जिहाद किंवा बेकायदेशीर अतिक्रमणांपासून सावध राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आता प्रशासनाने या बिल्डरच्या सर्व व्यवहारांची सखोल चौकशी करून गरिबांना न्याय द्यावा, अशी मागणी संपूर्ण शहरातून जोर धरू लागली आहे.






